हाथरस: येथील एका दलित तरुणीवर झालेल्या अत्याराच्या प्रकरण (Hathras gangrape and murder case) अजूनही धगधगत असताना हाथरसमध्ये आणखी एक बलात्काराचे प्रकरण उघड झाले आहे. येथे दोघांनी एका ४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपिंना बेड्या ठोकल्या आहेत. (rape on a 4 years old girl in )

पीटीआयने हे वृत्त दिले आहे. हाथरसमध्ये एका ४ वर्षीय चिमुकलीवर ९ वर्षीय आणि १२ वर्षीय मुलांनी बलात्कार केला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी या घटनेची माहिती गुरुवारी दिली. त्यानंतर स्थानिक जंक्शन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. दोन्हीही आरोपी मुले एकाच गावातील असून त्यांना अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. मुलीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठण्यात आले. त्यानंतर पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हाथरसमध्ये गेल्या महिन्यात एका १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. यात तिचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. या दलित तरुणीवर तिच्याच गावात राहणाऱ्या चौघांनी कथित बलात्कार केला.

क्लिक करा आणि वाचा बातमी-

बलात्कारानंतर या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर मोठी निदर्शने झाली. या प्रकणाचे पडसाद अमेरिकेत देखील उमटले. या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेशातील योगी सरकार सीबीआयच्याद्वारे करत आहे. सीबीआयने आपला तपास सुरू केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हाथरसमध्ये जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here