अहमदनगर: अहमदनगर-जामखेड या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण-नुतनीकरण भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन आज भाजपने टाकळीकाझी (ता. नगर) येथे केले होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर भाजपच्या लोकप्रतिनिधींसोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के देखील होते. मात्र, हा धागा पकडत खासदार डॉ. यांनी चांगलीच फटकेबाजी आपल्या भाषणात केली.

‘नगरमध्ये कोण कोणाचा गुरू आहे, हेच कळत नाही. कोण कोणाचा शिष्य हेही उमजत नाही. माझ्या सारख्या पोराला कोणी वेडात काढतंय. त्यामुळे आपण कोणाचाच वाईटपणा घेत नाही,’ असे विखे यांनी सांगितले व उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. राष्ट्रीय महामार्ग डांबरीकरण – नुतनीकरण भूमिपूजन समारंभ आज टाकळी काझी येथे खासदार विखे यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे यांच्यासह काँग्रेसचे संपत म्हस्के देखील व्यासपीठावर उपस्थित होते. हा धाग पकडून विखे आपल्या भाषणात म्हणाले, ‘संपत म्हस्के हे आज व्यासपीठावर आहेत. ते महाविकास आघाडीत आहेत. महसूलमंत्री त्यांच्या पक्षाचे आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री सुद्धा दौऱ्यात होते. त्यामुळे आपल्याला काही निधी वाढून मिळतो का, यासाठी लक्ष देण्यास त्यांना सांगा. तसेच आम्हाला निधी वाढेल, याची अपेक्षा नाही. पण सांगणे आमचे काम आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे तालुकाध्यक्ष आहात,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

वाचा:

‘असं वाटतयं संरक्षणमंत्री झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही’

‘नगर जिल्ह्यात प्रत्येक गोष्ट संरक्षण खात्याशी निगडीत आहे. संरक्षण विभागाचे खुप कामे आहेत. एक संपले की दुसरे येते. उड्डाणपूलाचा प्रश्न सुटला की के के रेंज येतो. के के रेंज झाले की नगर-जामखेड रस्ता, मग पुढे बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन. त्यामुळे असे वाटते संरक्षणमंत्री झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही,’ असे वक्तव्य देखील खासदार डॉ.सुजय विखे यांनी यावेळी केले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here