राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे आज नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर करण्यात आला. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा भाजपमधील नव्या नेतृत्वावर टीकेची तोफ डागली. ‘मागच्या चार वर्षांपासून मी भीतीच्या छायेखाली होतो. आता निर्दोष सुटलो आहे. त्यामुळं माझ्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं आहे. आता इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार,’ असा इशारा देखील खडसेंनी दिला.
वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना लिमलेटची गोळी देते की कॅडबरी हे काही दिवसांत कळेलच, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. त्याचाही खडसे यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील हे कुल्फी आणि चॉकलेट देऊन भाजपमध्ये प्रवेश देतात, असा प्रतिटोला खडसे यांनी हाणला.
वाचा:
भाजपमधून अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. मात्र, जे चिन्हावर निवडून आलेत त्यांना काही दिवस वाट पाहावी लागेल. अनेक आमदारही संपर्कात आहेत. मात्र, पक्षांतर बंदी कायद्यामुळं अडचणी आहेत,’ असं खडसे म्हणाले. ‘भाजपमधून कोणी सोडून जाऊ नये म्हणून राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पडण्याच्या अफवा पसरवल्या जातात. त्यात अजिबात तथ्य नाही. या अफवा सुरू असतानाच सरकारनं एक वर्ष पूर्णही केलं,’ याकडंही खडसे यांनी लक्ष वेधलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times