नाशिकः भाजपाचे अजून काही आमदार आणि नेते आमच्या संपर्कात आहेत, ते लवकरच भाजप सोडतील, आता तरी फक्त बॉक्स उघडलाय, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री यांनी केला आहे.

यांनी भाजपला राम राम करून पक्षात जाहीर प्रवेश केला. खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. त्याचबरोबर खडसेंपाठोपाठ भाजपमधील अजून काही आमदार आणि नेते संपर्कात आहेत, असा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. आत्तापर्यंत भाजपमध्ये अनेक नेते जात होते. पण, आता खडसे राष्ट्रवादीत आलेत त्यामुळं चर्चा थांबतील, असंही भूजबळ म्हणाले आहेत.

भाजपने आता खडसेंची काळजी करू नये ते आता राष्ट्रवादीत आले आहेत. भाजपकडून त्यांचा सतत अपमान होत होता आम्ही मात्र त्यांचा सन्मान करणार. खडसेंना काय मिळणार हे त्यांना आणि शरद पवार यांना माहिती आहे. योग्य वेळ आल्यावर शरद पवार खडसेंना न्याय देतीलच, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी आम्ही तातडीने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं त्यावरही विरोधकांकडून टीका होत आहे. केंद्राकडून सरकारचे पैसे मिळाल्यास अधिक मदत करता आली असती, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

वाचाः ?

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here