नवी दिल्लीः युपीमधील हाथरसच्या कथित सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले होते. राहुल गांधी आणि त्यांची बहीण कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी हे पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हाथरसमध्ये गेले. आता बिहारमधील एका दलित मुलीवर पंजाबच्या टांडामध्ये बलात्काराची घटना घडली आहे. या प्रकरणावर गप्प का? असा सवाल करत भाजपने राहुल आणि प्रियांका गांधींवर हल्लाबोल केला आहे.

ट्विटर फ्रेंडली नेते राहुल गांधी या टांडामधील घटनेवर चकार शब्दही बोलले नाहीत. राहुल गांधींनी एकही ट्विट केलं नाही, संताप नाही आणि पिकनिक (भेटायलाही गेले ) नाहीत. कॉंग्रेसने या प्रकरणी उत्तर द्यावं, अशी मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

बिहारमधील कॉंग्रेसबरोबर आघाडी करून निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावरही सीतारामन यांनी हल्ला चढवला. बिहारमधून पंजाबला गेलेल्या पीडित कुटुंबाबद्दल तुमची काही जबाबदारी नाही काय? असा सवाल त्यांनी तेजस्वी यांना केला. पंजाबमधील पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करणाऱ्यांसोबत भाजप आहे, असं सीतारामन म्हणाल्या.

विजय सांपला हे तिथे गेले होते. पीडितेला वेळेत न्याय मिळलून देण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, असं सीतारामन यांनी सांगितलं. यात्पूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला. जावडेकर यांनी राहुल गांधींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हाथरसच्या घटनेविषयी जे तावातावाने बोलत होते ते आता टांडामधील घटनेवर मौन आहेत. गांधी घराण्याला याचं काही पडलेलं नाही, असं म्हणत जावडेकर यांनी तेजस्वी यादव यांनाही लक्ष्य केलं.

तेजस्वी यादव या घटनेबाबत गप्प का आहेत? विशेष म्हणजे, पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील टांडा येथे बलात्काराची घटना घडली असून पीडित मुलगी ही मूळची बिहारची आहे, असं जावडेकर म्हणाले. टांडामध्ये ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिला जाळल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटकही केली. ही मुलगी बिहारची रहिवासी होती, असं सांगितलं जातंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here