म.टा. प्रतिनिधी, नगर: ‘ मतदारसंघात मला कोणा एकाचा विकास करायचा नाही. सर्वांगीण विकासासाठी पेरणी केली आहे, त्याची फळे लवकरच दिसतील. मुख्य म्हणजे मला केलेल्या कामाचे फ्लेक्स लावून मते मागण्याची वेळ येणार नाही,’ असा टोला राष्ट्रवादीचे आमदार यांनी विरोधकांना लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीला एक वर्ष झाले. त्यानिमित्त भाजपचे माजी मंत्री प्रा. यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार पवार यांच्या एक वर्षाच्या काळात कामे होत नसल्याची टीका केली होती. आपल्या काळात मंजूर केलेली कामेही हाणून पाडण्यात येत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. त्यानंतर आज आमदार पवार यांनीही आपण गेल्या वर्षभरात केलेल्या कामांची माहिती दिली आहे.

‘कुण्या ‘एका व्यक्तीचा’ विकास करण्याचं काम सुरू नाही तर संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचं काम सुरू आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या काळात केलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली असून याची अधिक माहिती आपल्या कार्यालयात उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. पवार यांनी या कामांसाठी सर्वांची साथ आवश्यक असल्याचे सांगताना म्हटले आहे, ‘विशेष म्हणजे मी एकटा हे सर्व करु शकत नाही. त्यासाठी ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’, बारामती ऍग्रो ली., कृषी विज्ञान केंद्र, बारामती, या संस्थांसोबतच इतरही अनेक संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी, महिला भगिनी, युवा या सर्वांचंच मोलाचं सहकार्य मिळतंय. थोडक्यात काय तर कर्जत-जामखेडच्या विकासाची पेरणी केली असून प्रयत्नांची मेहनत आणि सर्वसामान्य जनतेच्या साथीचं खत घालून कर्जत-जामखेडच्या मातीत विकासाचं पीक काढण्याचा माझा प्रयत्न आहे. हे पीक लवकरच बहरात येईल, असा विश्वास आहे. वर्षभरातील कामांचा हा लेखा जोखा मांडत असताना विरोधकांनीही केवळ विरोधासाठी विरोध न करता कर्जत-जामखेडच्या विकासासाठी सहकार्य करावं, असं माझं आवाहन आहे. कारण त्यांना कुण्या ‘एका व्यक्तीचा’ विकास करण्याचं काम सुरू नाही तर संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचं काम सुरू आहे,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

‘मतदारांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला, या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. तसं पाहिलं तर आमदार म्हणून काम करताना एक वर्षाचा कालावधी हा खूप छोटा असतो, पण तरीही गेल्या वर्षभरात माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी काय केलं याची गोळाबेरीज इथल्या जनतेसमोर मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो. कोणतंही काम करायचं असेल तर त्याची एक प्रक्रिया असते. सर्वेक्षण, प्रस्ताव, तांत्रिक-प्रशासकीय मान्यता, निधीची उपलब्धता आणि निविदा काढल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात. ही संपूर्ण प्रक्रिया काही एका चुटकीसरशी होणारी नसते. निवडणूक झाल्यानंतर पहिले दोन महिने हे सरकार स्थापनेतच गेले. अधिवेशन संपत नाही तोच जागतिक महामारीच्या संकटाने आपल्या राज्यात हातपाय पसरले आणि या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्याऐवजी सगळा निधी आरोग्य सुविधांकडं वळवावा लागला. दुसरीकडं राज्याला येणारा महसूल लॉकडाऊनमुळं पूर्णपणे ठप्प झाला. आरोग्यविषयक खर्चाची तोंडमिळवणी करणंही अशक्य झालं. एका वर्षातील कामाचा हिशेब मांडत असताना या वर्षाची स्थितीही समजणं आवश्यक आहे. सुरवातीचे जेमतेम तीन महिनेच काम करण्यासाठी मिळाले. पण सुदैवाने आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येतेय. कामाचा हिशेब मांडत असताना तो काही मी मतं घेण्यासाठी मांडत नाही आणि मतदान मागण्याच्या वेळीही हा हिशेब मला ‘फ्लेक्स’वर मांडून जाहिरात करण्याची गरज पडणार नाही. कारण तोपर्यंत बहुतांश कामे ही पूर्ण झाल्याने लोकांना डोळ्याने दिसतील, असंही ते म्हणाले.

निवडणुकीपूर्वीपासूनच मतदारसंघात संपर्क असल्याने इथल्या कामाचा बऱ्यापैकी आवाका लक्षात आला होता. रस्ते, पाणी, वीज हे मूलभूत प्रश्न तर आ वासून होतेच पण सरकारी योजनाही लोकांपर्यंत पोचत नव्हत्या. त्यामुळं प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास करुन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला. रस्ते, पाणीपुरवठा, वीज याचे अनेक प्रस्ताव मंजूर करुन आणले. ही कामे लवकरच सुरु होतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here