आज नवरात्रीचा नववा दिवस आहे, तो दिवस ज्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला. याचा दिवस दुर्गा मातेनं दानव महिषासुराला पराभूत करून जगाचं रक्षण केलं. जशी दुर्गामाता संकटाच्या काळी जनतेच्या रक्षणासाठी धावून येते, त्याचप्रमाणे समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या तुम्हीदेखील पोलिस दलाच्या दुर्गा आहात. कोविडच्या काळात समाजाचे रक्षण करण्याची आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी तुम्ही अतिशय जिकरीनं पार पाडली आहे, असं म्हणत अनिल देशमुख यांनी कौतुक केलं आहे.
तुमचे कार्य पार पाडत असताना अनेक वेळा दोन भूमिका पार पाडाव्या लागतात. जेव्हा तुम्ही समाजातील असंख्य कुटुंबीयांची काळजी घेत असता तेव्हाच तुमच्या कुटुंबीयाची देखील काळजी घ्यावी लागते. तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या खूप सक्षमतेनं पार पाडता हे आम्ही अनुभवतो आहे. पोलिस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून या राज्यासाठी तुम्ही करत असलेल्या सेवेबद्दल आमच्या सर्वांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times