मुंबईः राज्यात आज १३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ६ हजार ४१७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १० हजार ००४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या आणखी जवळ पोहचला असून हा खूप मोठा दिलासा ठरला आहे. ()

राज्यात थैमान घातलं असतानाच आता सकारात्मक बातमी समोर येत आहे. राज्यात आता झपाट्यानं करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून नवीन करोनाबाधितांचा आकडा १० हजारांहून खाली उतरला आहे. आज दिवसभरात ६ हजार ४१७ रुग्ण सापडले आहेत. आजही नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज १० हजार ००४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर, राज्याच आजपर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ८८. ७८ टक्के इतके झाले आहे.

राज्यात करोना मृतांची संख्याही कमी होताना दिसत आहे. आज १३७ करोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका झाला असून राज्यात एकूण मृतांचा आकडा ४३ हजार १५२ इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८५,४८,०३६ चाचण्यांपैकी १६,३८,९६१ (१९.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,०३,५१० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १४,१७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here