पाटणाः बिहारच्या कैमूर जिल्ह्यात घेतलेल्या सभेत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केलं. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जाहीर सभेत पाकिस्तान आणि ओवेसीचं नाव घेतलं जातंय. बिहारमध्ये आता भाजपला ओवैसी दिसत आहेत, अशी टीका त्यांनी केली. ‘मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात भाजप कट रचत आहे. त्यांना निवृत्त करून भाजप आमदाराला बिहारचा मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू आहे’, असा आरोप ओवैसी यांनी केलाय.

महायुतीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात बिहारमधील जनता भरडली गेली आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारकीर्दीत अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. ते गरीबीत ढकलले गेले आहेत. उपेंद्र कुशवाह यांना मुख्यमंत्री बनवा. तरच बिहारच्या जनतेला न्याय मिळेल, असं ओवैसी म्हणाले.

कैमूरच्या ७० टक्के धान गिरण्या बंद

नितीश सरकारच्या काळात कैमूरमधील ७० टक्के धान गिरण्या बंद झाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बिहारमध्ये आले तेव्हा त्यांनी आपलं नाव घेतलं. पण बिहारमध्ये ओवैसी कसे दिसले? बिहारमध्ये आल्यावर मुख्यमंत्री योगींनी बिहारबद्दल बोलायचं होतं. पण ते पाकिस्तान आणि माझ्याबद्दल बोलत होते, असं ओवैसी म्हणाले.

ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलं. मी आपल्या समोर नतमस्तक आहे. बिहारच्या त्या वीर जवानांनी गलवान खोऱ्यात चिन्यांना चोख प्रत्युत्तर देत देशासाठी बलिदान दिलं, असं मोदी म्हणाले. त्या शूर जवानांना आणि त्यांच्या आई-वडिलांना सॅल्यूट करतो. पण ज्या मातांनी आपली मुलं गमावली त्यांच्या मुलांच्या बलिदानाचा बदला मोदींनी चीनकडून घेतला की नाही? पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावं, असं ओवैसी म्हणाले.

बिहारमध्ये एका वर्षाच्या आता १९ लाख रोजगार देण्याचं आश्वासन भाजपने निवडणूक जाहीरनाम्यातून दिलं आहे. तर आरजेडीने १० लाख रोजगार देऊ, असं म्हटलं आहे. या दोघांनी बिहारवर १५ -१५ वर्षे राज्य केलं, किती नोकर्‍या दिल्या? असा प्रश्न ओवैसींनी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here