मुंबई- सीझन १४ चा तिसरा आठवडा भावनिक आणि धक्कादायक अशा दोन्ही पातळीवर सुरू झाला. बिग बॉसने घराला गौहर खानची टीम, हिना खानची टीम आणि सिद्धार्थ शुक्लाची टीम अशा तीन संघात विभागले. शोमध्ये स्पर्धकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सीनिअर जे म्हणतील त्या पद्धतीने वागण्याचं ठरवलं.

जे टास्क गमावतील त्यांना घराच्या बाहेर पडावं लागणार हे बिग बॉसने सांगितल्यामुळे प्रत्येकजण जीव ओतून टास्क करत होता. शेवटी हिनाची टीम जिंकली. तर निक्की तांबोळी, पवित्र पुनिया आणि एजाज खान यांचा समावेश असलेल्या सिद्धार्थची टीम हरली. पहिल्या आठवड्यात निक्की सुरक्षित स्पर्धक असल्यामुळे ती यावेळी घराच्या बाहेर गेली नाही. शेवटी सिद्धार्थसोबत पवित्र आणि एजाज यांना घराच्या बाहेर पडावं लागलं.

दरम्यान, बिग बॉसने रेड झोन नावाचा नवीन भागही घरात तयार केला. पवित्र आणि एजाज हे त्या भागात जाणारे पहिले स्पर्धक होते. तसेच या झोनमध्ये येणाऱ्या स्पर्धकांवर घरातून बाहेर जाण्याचा धोका कायम राहील. असं असलं तरी त्यांना ग्रीन झोनमध्ये परत येण्याची संधीही देण्यात येईल.

या आठवड्यात प्रेक्षकांनी पहिलं कॅप्टन पदासाठीचं टास्कही पाहिलं. पवित्र आणि एजाज दोघंही बाहेर राहून हा टास्क पाहत होते. टास्क संपल्यानंतर निशांतसिंग मलकानीला कॅप्टन म्हणून घोषित केले. असं असलं तरी निशांतची कॅप्टन्सी फक्त एक दिवस टिकली. कारण बिग बॉसने त्याच्या नेतृत्वात बरेच नियम मोडले असल्याचं निदर्शनास आणून दिलं.

इथे पाहा अपडेट्स-

जास्मीन भसीन एजाज खानला सांगते की घरात कोणीही तिला समजून घेत नाही. यानंतर जास्मीन अभिनव शुक्लाशी जान कुमार सानूबद्दल बोलते. यावर बोलताना अभिनव बोलतो की जान निक्कीला फक्त मैत्रीण मानत नाही तर तो तिच्यावर प्रेम करतो.

सलमान बिग बॉसच्या घरात दिव्या खोसला कुमारचं स्वागत करतो. यानंतर दिव्या स्पर्धकांना एकमेकांच्या डोळ्यात पाहून त्यांना एकमेकांच्या डोळ्यात काय दिसतं ते सांगायला सांगते. पहिल्यांदा एजाज खान आणि पवित्र पुनिया एकमेकांच्या डोळ्यात डोकावून सांगतात. त्यानंतर निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू एकमेकांच्या डोळ्यात बघून काय वाटतं याबद्दल सांगत असतात. तिसर्‍या क्रमांकावर राहुल वैद्य आणि निशांत मलकानी एकमेकांच्या डोळ्यात पाहून त्यांना समोरच्याचा डोळ्यात काय भावना दिसतात ते सांगतात.

एजाज खानला रेड झोनमध्ये कसं वाटलं असा प्रश्न विचारतो. यानंतर तो रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांच्याशी सामाना विषयीही चर्चा करतो. सलमान रुबीनाला सविस्तरपणे घडलेली संपूर्ण गोष्ट सांगतो. यानंतर रुबीना सलमानची माफी मागते.

जानला निक्की तांबोळीशी बोलायचं आहे पण ती स्पष्ट नकार देते. दरम्यान, पवित्र निक्कीला घरातल्या कोणत्याच स्पर्धकावर विश्वास ठेवू नये असा सल्ला देते. दरम्यान एक खास पाहुणा व्हिडिओ कॉलवर तुमच्याशी बोलू इच्छित असल्याचं सलमान सांगतो. यानंत कविता कौशिक व्हिडीओ कॉलवर येऊन एजाज खानला प्रश्न विचारते.

बिग बॉसच्या घरात जेव्हाही सलमान येतो तेव्हा नवनवीन खुलासेच करतो. असाच एक खुलासा तो शनिवारी विकेण्ड का वॉरमध्ये करताना दिसणार आहे. हा खुलासा ऐकून निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्या मैत्रीत दरी येणार आहे.

घरात दांडिया क्वीन प्रीती- पिंकी आल्याने मोठ्या उत्साहात स्पर्धक दांडिया आणि गरबा खेळताना दिसतात. एकीकडे खेळीमेळीचं वातावरण असताना दुसरीकडे स्पर्धकांच्या मनात सलमान खान काय बोलणार याचीही धाकधूक आहे.

घरात नवरात्रोत्सवा निमित्त संपूर्ण घर सजवण्यात आलं आहे. घरात प्रीति आणि पिंकीसह दांडियाचा आनंद स्पर्धक घेताना दिसतात. घरात नवरात्रीचा उत्साह मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि देवीची प्रार्थनाही केली जाते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here