श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरचे (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते (Farooq Abdullah) यांनी आज शनिवारी दुर्गा अष्टमी आणि महानवमीनिमित्त येथील प्राचीन दुर्गा नाग मंदिरात () दुर्गामातेचे दर्शन घेतले. अब्दुल्ला यांनी यावेळी शांती आणि मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. याच आठवड्यात अब्दुल्ला यांनी ८३ वा वाढदिवस साजरा केला. ( prayed for peace and welfare of mankind in durga nag temple)

फारूख अब्दुल्ला दलगेट भागात असलेल्या मंदिरात आपल्या पक्षाच्या सदस्यांसोबत पोहोचले होते. त्या वेळी काश्मीरी पंडित समुदायाच्या लोक मंदिरात हवन करत होते. आजचा दिवस आमच्या हिंदू बांधव आणि भगिनींसाठी आणि मंदिरासाठी देखील हा महत्वाचा दिवस आहे. मी येथे साजरा होत असलेल्या धार्मिक उत्सवात शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे, असे अब्दुल्ला म्हणाले.

अब्दुल्ला यांनी विस्थापित काश्मिरी पंडित समुदाय लवकरात लवकर आपल्या घरी परतावेत अशी प्रार्थना देखील केली. या वेळी अब्दुल्ला यांनी पारंपरिक पठाणी सूट परिधान केला होता. तसेच त्यांनी मास्कही घातला होता. कोविड-१९ च्या या काळात सार्वजनिक स्थळांवर वावरताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेला केले आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी-

७०० वर्षे जुने आहे. सन २०१३ मध्ये मंदिर परिसरात एका शिवलिंगाची स्थापना देखील करण्यात आली होती.

क्लिक करा आणि वाचा बातमी-

क्लिक करा आणि वाचा बातमी-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here