नवी दिल्लीः बिहार विधानसभा निवडणुकीत मतदानाला अजून काही दिवस शिल्लक आहेत. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला बिहारच्या ७१ जागांवर मतदान होणार आहे. या पार्श्वभीमीवर सर्व पक्षांनी आपल्या प्रचाराला वेग दिला आहे. नेत्यांमधील शब्दीय युद्धही तीव्र झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या अगदी आधी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आरजेडी नेते यांच्यावर हल्ला चढवला आहे.

सरकारविरोधात कोणतीही नकारात्मकता नाही- नड्डा

बिहार निवडणुकीत एनडीएचा विजय होईल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला. बिहारच्या जनतेला स्थिरता आणि विकास हवा आहे. आणि हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि इथे नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच होऊ शकतं. जनतेला नितीशजींचं पाठबळ हवे आहे, असं नड्डा म्हणाले. बिहारमध्ये कोणतीही सरकारविरोधात नाराजी (अँटी इन्कंबेंसी) दिसत नाही. नागरिकांच्या आपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी नितीश कुमार यांची आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी हे जग आणि देशातील सर्वात विश्वासू नेते आहेत. तसेच नितीश कुमार हे बिहारमधील सर्वात विश्वासू नेते आहेत. त्यांच्या कामातून हे स्पष्ट झालं आहे. आम्ही एकमेकांना पूरक आहोत, असं नड्डा म्हणाले.

नड्डांचा आरजेडीवर हल्ला

नागरिक तेजस्वी यादव यांच्या सभांना गर्दी करत असले तरी त्यांच्या पक्षाचा डीएनए काय आहे हे त्यांना माहित आहे. अराजकता हा त्यांच्या पक्षाचा डीएनए आहे. हे नागरिकांना ठाऊकच आहे. राजकारणात आपल्या चुका स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नका. आरजेडी अजूनही आपल्या चुकांना शक्ती समते आणि आपण चूक केलीय हे ही त्यांना कुठेही जाणवत नाही. लालूजींनी केलेले काम हे याची त्यांना समज नाही, असं नड्डा म्हणाले.

तेजस्वी सध्या विरोधी पक्षनेते आहेत. २०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांची उपस्थिती पाहा, करोनाचा काळात त्यांनी काय केलं पाहा, पुराच्या वेळी कायम पाहा. ते कोणालाही भेटत नाही. नितीशकुमार याचं काम बघा. सर्व प्रशासनाने चांगलं काम केलं आहे. त्यामुळेच परिस्थइती नियंत्रणात आहे, असं नड्डा म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here