शिवहर विधानसभा मतदारसंघातील जनता दलाचे राष्ट्रवादीचे ( ) उमेदवार शनिवारी प्रचारासाठी गेले होते. पूरनहिया प्रखंड येथील हाथसर गावाजवळ ते नागरिकांशी संवाद साधत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबाराने गोंधळ उडाला. छातीत गोळी लागल्यामुळे श्रीनारायण सिंह घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले.
गोळीबाराने उडाला
गोंधळ
गोळीबारानंतर घटनास्थळावरून पळणाऱ्या दुचाकीस्वारांवर जमावाने हल्ला केला. यात एक आरोपी घटनास्थळीच पकडला गेला. यावेळी जमावाने केलेल्या मारहाणी त्याचाही जागीच मृत्यू झाला. जनता दल राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनारायण सिंह यांना शिवहर रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले. तिथून डॉक्टरांनी त्यांना सीतामढी येथे नेण्यास सांगतिलं. पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. श्रीनारायण सिंह यांच्या हत्येच्या बातमीने समर्थकांमध्ये संताप पसरला आहे.
हल्लेखोरांचा तपास सुरू
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे. आरोपी हे उमेदवाराचे समर्थक म्हणून गर्दीत घुसले होते आणि संधी मिळताच त्यांनी गोळीबार केला. दुचाकीवरून फरार झालेल्या हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. श्रीनारायण सिंह हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते, असं सांगण्यात येतंय. त्यांच्यावर दोन डझनहून अधिक खटले सुरू होते. श्रीनारायण हे शिवहर जिल्ह्यातील डुमरी कातसरी ब्लॉकमधील नया गावचे रहिवासी होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times