म .टा .प्रतिनिधी ,कोल्हापूरः मित्राने घेतलेली नवीन घेत असताना एका अभियंत्याला आपला जीव गमवावा लागला. गडहिंग्लज येथे ही दुर्घटना घडली. यामध्ये ऋषीकेश उमेश पोतदार या दुर्दैवी युवकाचा अंत झाला.

या घटनेची अधिक माहिती अशी, ऋषिकेशसह अनेक मित्र शुक्रवारी रात्री उशिरा जेवण करून कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. त्याच वेळी तिथे संग्राम पाटील हा आपली नवीन गाडी घेऊन तेथे आला. नवीन गाडीची जरा ट्रायल घेतो म्हणून ऋषिकेशने त्याच्या कडून गाडी घेतली. त्यानंतर त्याने फेरफटका मारण्यास सुरुवात केली. काही अंतर गेल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या एका दुचाकीला धडकून तो गडहिंग्लज नगरपालिकेच्या कठड्यावर कोसळला. या मध्ये तो जागीच ठार झाला.

ऋषिकेशने संगणक पदवी घेतली होती. तो पुण्यात नोकरीला होता. लॉकडाऊन मुळे नोकरी गेल्याने तो गावी आला होता. त्याच्या वडिलांचाही काही वर वर्षांपूर्वी दुचाकी अपघातात निधन झाले होते. ऋषिकेशचाही दुचाकी अपघातातच अंत झाल्याने त्याच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. याबाबत गडहिंग्लज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here