नागपूरः भरबाजारात दोन तरुणींना बंदुकीचा धाक दाखविल्याची घटना समोर आली आहे. धरमपेठ परिसरातील अत्यंत वर्दळीच्या अशा लक्ष्मीभूवन चौक परिसरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.

ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७च्या सुमारास या परिसरातील बटुकभाई ज्वेलर्ससमोरील परिसरात घडली. या प्रकरणातील दोन पीडित तरुणी ह्या धरमपेठेतील बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. खरेदीनंतर त्या कारमध्ये बसल्या. इतक्यात एक अनोळखी आरोपी मोटरसायकलवर तेथे आला. तो अचानक त्यांच्या कारमध्ये शिरला. ‘ही आमची गाडी आहे तुम्ही चुकीच्या गाडीत बसलात,’ असे या तरुणींनी त्याला सांगितले. यावर त्याने या दोघींना बंदूक दाखविली. बंदूक बघताच तरुणी घाबरल्या आणि त्यांनी आरडाओरडा केला. या प्रकारात आरोपीसुद्धा घाबरला. त्याने बाईक तेथेच सोडली व तेथून पळ काढला. आरोपीचा उद्देश या तरुणींना लुटणे हा होता की त्यांचे अपहरण करणे हा होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरा एका युवकाला ताब्यात घेतल्याचे कळते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here