वृत्तसंस्था, श्रीनगर

जम्मू-काश्मीरचा परत मिळवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये जोरात हालचाली सुरू झाल्या आहे. या मागणीसाठी विरोधक एकत्र आल्याने कश्मीरमध्ये नवीन समीकरण पुढे आले आहे. राज्याला पुन्हा विशेष दर्जा पुनर्स्थापित व्हावा, यासाठी ‘पिपल्स अलायन्स फॉप गुपकर डिक्लेरेशन’ (पीएजीडी) या संघटनेची स्थापना करण्यात आली असून, तिची पहिली बैठक शनिवारी ‘पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी’च्या (पीडीपी) अध्यक्ष व आणि माजी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी पार पडली.

‘पीएजीडी’च्या या बैठकीत ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर मेहबूबा यांची संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच सज्जाद लोन यांची संघटनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘पीएजीडी’ हे व्यासपीठ भाजपविरोधी असून, देशविरोधी नाही, असे अब्दुल्ला यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

”पीएजीडी’ हे देशविरोधी असल्याचा भाजप खोटा प्रचार करत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, की हे सत्य नाही. हे व्यासपीठ भाजपविरोधी आहे यात शंका नाही, पण ते देशविरोधी नक्कीच नाही’, असे अब्दुल्ला म्हणाले. कलम ३७० रद्द करून किंवा जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागून भाजपने सांघिक ढाच्या तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ‘देशाची घटना नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तसेच, देश विभागण्याचाही प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्टला कलम ३७० रद्द करून संघराज्य रचना मोडीत काढण्याचाही प्रयत्न आपण पाहिला आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, की ‘पीएजीडी’ देशविरोधी अजिबात नाही. आणि लडाख प्रांतातील जनतेला त्यांचे हक्क पुन्हा मिळवून देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यापेक्षा वेगळे काहीही आमचे उद्दिष्ट नाही.’

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचा झेंडा हा संघटनेचे प्रतिक असेल, असे सज्जाद लोन यांनी नमूद केले आहे. १७ नोव्हेंबरला श्रीनगरमध्ये एका संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून, त्यानंतर दोन आठवड्यांमध्ये जम्मूमध्ये आणखी एक बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

धर्माच्या नावाखाली त्यांनी आमच्यामध्ये (जम्मू-काश्मीर व लडाख) फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. हा कुठलाही धार्मिक संघर्ष नाही. आमच्यामध्ये एकी आहे.

– फारुख अब्दुल्ला, अध्यक्ष-नॅशनल कॉन्फरन्स

मेहबुबा यांच्यावर टिकास्त्र

विशेष राज्याचा दर्जा मिळून जम्मू-काश्मीरचा ध्वज पूनर्स्थापित होईपर्यंत तिरंगा हातात घेणार नाही, या मेहबुबा मु्फ्ती यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टिकेची झोड उठत आहे. मेहबुबा यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. त्यांचे हे वक्तव्य देशद्रोही असून, त्यांना अटक करण्याची मागणी जम्मू-काश्मीर भाजपने केली आहे. कलम ३७० घटनात्मक पद्धतीने रद्द करण्यात आले आहे व कोणत्याही परिस्थितीत ते पुनर्स्थापित केले जाणार नाही, असे पक्षाने म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना डोग्रा फ्रंटतर्फे (एसएसडीएफ) मेहबुबा यांच्याविरोधात निर्देशने करण्यात आली.

अब्दुल्ला दुर्गा मंदिरात

श्रीनगर : फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी दुर्गा अष्टमी आणि राम नवमीच्या निमित्ताने येथील दुर्गा नाग मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी ८४ वर्षीय अब्दुल्ला यांनी देवीकडे शांतता आणि मानवजातीच्या कल्याणासाठी; तसेच विस्थापित झालेले काश्मिरी पंडित लवकरात लवकर त्यांच्या घरी परत यावेत, अशी प्रार्थना केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here