वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी, देशभरातील जनता करोना संसर्गामुळे प्रभावित झाली आहे, त्यामुळे सगळ्यांनाच उपलब्ध करून दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

भारतीय जनता पक्षाने बिहारमधील निवडणुकीच्या निमित्ताने कोव्हिडवरील लस आल्यास तेथील जनतेला मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत विविध राज्यांनाही मोफत लस मिळायला हवी, अशी मागणी होऊ लागली आहे. संपूर्ण देशातील जनता करोना संसर्गाला तोंड देत असल्याने सगळ्यांनाच ही लस मोफत उपलब्ध व्हावी, असे मत केजरीवाल यांनी दिल्ली ईशान्येतील उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

‘जेव्हा करोनावरील लस उपलब्ध होईल, तेव्हा मोफत मिळावी, हा देशातील नागरिकांचा हक्कच आहे’, असेही ते म्हणाले. दरम्यान, लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वितरण विशेष लसीकरण कार्यक्रमांतर्गत केले जाईल. केंद्राकडून अत्यावश्यक गटासाठी थेट लस उपलब्ध करून दिली जाईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. राज्य आणि जिल्हा यंत्रणेना केंद्राकडून ही लस थेट खरेदी करता येईल, त्यानंतर ती अत्यावश्यक गटांना उपलब्ध करन देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाचा :

वाचा :

‘मोफत लशीचे आश्वासन योग्यच’

‘ दरम्यान भाजपने मोफत करोना लशीचे दिलेले आश्वासन योग्यच आहे. सत्तेत आल्यानंतर कोणती कामे करायची आहेत, याबाबत पक्ष आश्वासन देऊ शकतो,’ असे सांगून केंद्रीय अर्थमंत्री यांनी शनिवारी आश्वासनाचे समर्थन केले होते.

बिहारमध्ये सत्तेत आल्यास राज्यातील सर्व नागरिकांना करोनाची लस मोफत देण्याचे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे.

भाजपच्या या आश्वासनावर विरोधी पक्षांनी टीका करून या प्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, भाजप करोना संसर्गाचा वापर राजकीय फायद्यासाठी करीत असल्याचाही आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर, सीतारामन यांनी आश्वासनाचे समर्थन केले आहे. ‘भाजपच्या जाहीरनाम्यात मोफत करोना लशीचे आश्वासन देण्यात आले आहे. सत्तेत आल्यानंतर कोणती कामे करायची आहेत, याबाबतचे आश्वासन राजकीय पक्ष देऊ शकतो. आरोग्य हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे, मोफत करोना लशीचे दिलेले आश्वासन योग्यच आहे,’ असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here