महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. आयोगाने पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, या मुद्द्यावरून लगेच राजकारणही सुरू झाले आहे. पंजाबमधील बलात्कार आणि मृत्यूप्रकरणी काँग्रेस अद्याप गप्प का आहे, असा सवाल भारतीय जनता पक्षाने उपस्थित केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांनी या मुद्द्यावरून राहुल आणि यांना थेट लक्ष्य केले. ‘हाथरस घटनेनंतर तेथे जाण्यासाठी धडपडणारे पंजाबमधील घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी का जात नाहीत? काँग्रेसशासित राज्यांमध्ये सुरू असलेल्या महिला अत्याचारांवर काँग्रेस नेते का गप्प आहेत,’ असा सवाल निर्मला सीतारामन यांनी उपस्थित केला आहे.
वाचा :
वाचा :
काँग्रेसचे प्रत्युत्तर
बिहारच्या स्थलांतरित दलित कुटुंबातील सहा वर्षांच्या एका लहानग्या मुलीवर पंजाबमध्ये करण्यात आलेला बलात्कार आणि त्यानंतर तिची करण्यात आलेली हत्या, यावर काँग्रेसने मौन बाळगल्यावरून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले. दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या हाथरस भेटीवरून प्रश्न उपस्थित करून त्या पीडितेचा अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे. बिहारमधील निवडणुकीसाठी भाजप पंजाबच्या घटनेचा मुद्दा पुढे करून राजकारण करीत असल्याचा आरोप पक्षाच्या प्रवक्त्या सुष्मिता देव यांनी केला. पंजाबमधील घटनेनंतर तेथील काँग्रेस सरकारने तातडीने कारवाई केली होती. मात्र, ‘हाथरस’प्रकरणी उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार ते प्रकरण दडपण्याचा, पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न करीत होती, असेही देव यांनी म्हटले.
वाचा :
वाचा :
मुलीची हत्या
दुसरीकडे, छेडछाडीला विरोध करणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील जिल्ह्यात घडली आहे. ही घटना शुक्रवारी घडली. मृत्युमुखी पडलेली मुलगी बारावीची विद्यार्थिनी आहे. क्लासमधून परत असलेल्या मुलीला तीन युवकांनी घेरले. त्यानंतर संबंधित युवक मुलीच्या घरी पोहोचले. तिची छेड काढली. त्याला विरोध केला असता युवकांनी मुलीला मारण्यास सुरुवात केली. युवतीच्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना रोखले असता संबंधित युवतीची हत्या करून युवक घरातून निघून गेले. त्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार मनीष यादव, सोपाली यादव आणि गौरव चाक यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संबंधित युवकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times