नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच आरएसएसचा मैदानात न होता सभागृहात पार पडत आहे. यावेळी ५० जणांच्या उपस्थितीत सरसंघचालक यांनी जनतेला संबोधित केलं आहे.

‘करोनामुळं इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी स्वयंसेवकांमध्ये दसरा मेळावा करण्याची वेळ आपल्यावर आलीये, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. यंदा संपूर्ण जगावर करोनाचं संकट आलं आहे. या संकटकाळात संपूर्ण देश एक झाला आहे, सर्वांनी मिळून करोनासोबत लढा दिला आहे. सेवाभाव जो आपला समाज विसरला होता, तो पुन्हा जागृत झाला आहे,’ असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.

‘२०१९मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं त्याचबरोबर ९ नोव्हेंबरला न्यायालयानं राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. तो निर्णय संपूर्ण देशानं संयमानं स्वीकारला. त्याचबरोबर सीएएमुळं देशातील कोणत्याही नागरिकाला धोका नाही.’ असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला आहे. तसंच, देशात राहणाऱ्या लोकांमध्ये स्पर्धा असावी युद्ध नसावे. समाजात कटुता निर्माण होऊ नये, असंही ते म्हणाले आहेत.

‘या काळात चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली. पण, लडाखमध्ये भारतीय सैन्यानं चीनला प्रत्युत्तर दिलं त्यामुळं चीनला जोरदार धक्का बसला आहे. आता भारताला सगळ्याच अर्थानं चीनपेक्षा मजबूत होण्याची गरज’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here