नवी दिल्ली : देशातील करोना संक्रमणाचा दर सध्या कमी होताना दिसतोय, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात ५० हजार १२९ नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. यासोबतच आत्तापर्यंतच्या एकूण करोना संक्रमितांची संख्या ७८ लाख ६४ हजार ८११ वर पोहचलीय. देशात सध्या एकूण ६ लाख ६८ हजार १५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

घटतोय

तर गेल्या २४ तासांत एका दिवसात करोना संक्रमणामुळे ५७८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, हा गेल्या ९८ दिवसांतील म्हणजेच तीन महिन्यांहून अधिक काळातला हा सर्वात कमी आकडा आहे. आत्तापर्यंत देशात १ लाख १८ हजार ५३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

समोर आलेल्या अधिकृत आकड्यानुसार, भारतात १८ जुलैनंतर मृत्यू दरात घट झाल्याचं दिसून येतंय. सप्टेंबर महिन्यात देशात सर्वाधिक संक्रमण आणि मृत्यू फोफावल्याचं दिसून आलं. एका दिवसात कोविड १९ मुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद १५ सप्टेंबर रोजी झाल्याचं आकडेवारी सांगतेय. या दिवशी एकूण १ हजार २७५ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

वाचा : वाचा :

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, २४ तासांत रुग्णालयात भर्ती झालेल्या रुग्णांच्या आकड्याहून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासांत ६२ हजार ०७७ रुग्णांनी करोनावर मात केल्याचं समोर आलंय. यासोबतच आत्तापर्यंत देशात एकूण ७० लाख ७८ हजार १२३ करोना संक्रमित रुग्ण या संकटातून सुखरूप बाहेर आले आहेत.

काय सांगतेय आकडेवारी

देशाचा ८९.९९ टक्क्यांवर आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा दर ८.४९ टक्क्यांवर आहे तर डेथ रेट अर्थात मृत्यू दर १.५० टक्के आहे. रुग्णांचा ४.३९ टक्क्यांवर आहे.

शनिवारी २४ ऑक्टोबर रोजी एकूण ११ लाख ४० हजार ९०५ नमुन्यांची करोना चाचणी करण्यात आली. आत्तापर्यंत ओळखण्यासाठी आणि रोखण्यासाठी तब्बल १० कोटी २५ लाख २३ हजार ४६९ नमुन्यांची करोना चाचणी पार पडलीय, अशी माहिती आयएमसीआर (ICMR) कडून देण्यात आलीय.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here