म. टा. प्रतिनिधी, : पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचे झाल्याच्या धक्कादायक घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली. मात्र, या बारावर्षीय मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मोठ्या शिताफीने सुटका करवून घेतली. मुलगा सुखरूप घरी पोहोचल्याने त्याचे पालक व पोलिस विभागाचा जीव भांड्यात पडला.

ही घटना शुक्रवारी दुपारी १.२० ते संध्याकाळी ६.३० यादरम्यान घडली. पल्लवी कमलेश जावडीकर (वय ३१) यांचे पती कमलेश वाडी पोलिस ठाण्यात पोलिस नाईक या पदावर कार्यरत आहेत. ते आपल्या कुटुंबासह गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोलिस लाइन टाकळी येथील पोलिस वसाहतीत राहतात. त्यांचा मुलगा सार्थक हा शुक्रवारी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास घरासमोर खेळत होता. यावेळी चार अनोळखी व्यक्ती त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तेथे आल्या. त्यांनी सार्थकला मारुती व्हॅनमध्ये बसविले व पळवून नेले. काही वेळातच त्यांनी कमलेश यांना फोन केला. ‘तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, त्याच्या सुटकेसाठी १० लाख रुपये तयार ठेवा’, अशी धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी तातडीने सूत्रे हलविली. मात्र, सार्थकची काहीच माहिती मिळेना. अपहरणकर्ते मुलाला घेऊन शहरात फिरत असावेत, असा पोलिसांचा अंदाज होता.

चहा पिण्यासाठी थांबले अन्…

काही वेळाने अपहरणकर्ते गणेशपेठ परिसरात चहा पिण्यासाठी थांबले. या वेळात सार्थकने गाडीतून पळ काढला. तेथून तो शुक्रवारी तलाव परिसरात राहणाऱ्या त्याच्या मावशीकडे पोहोचला. मावशीने त्याच्या पालकांना फोन करून ही माहिती दिली. अखेर सार्थक सुखरूप घरी पोहोचला. अपहरणकर्त्यांनी मास्क बांधलेले असल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड आहे. अद्याप चारही आरोपी फरार आहेत. मात्र, कमलेश पोलिस कर्मचारी आहेत याची पुरेपूर कल्पना आरोपींना होती. त्यामुळे व्यावसायिक वैमनस्यातून ही घटना घडल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here