मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या कंगानानं पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली होती. त्यानंतर, आज दसऱ्याच्या मुहूर्तावर तिच्या ऑफिसचा फोटो पुन्हा शेअर करत पुन्हा ठाकरे सरकारला डिवचलं आहे. ‘संजय राऊत माझं तुटलेलं स्वप्न तुमच्याकडे पाहून हसतंय. पप्पू सेना माझं घर तोडू शकतात मला नाही. बंगला क्रमाक५नं आज वाईटावर विजय मिळवला आहे,’ असं खोचक ट्विट कंगनानं केलं आहे.

आरक्षणाबाबत कंगनाचं ट्विट

गरीबीच्या आधारावर आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर कंगनानं भाष्य केलं आहे. गरिबीच्या आधारावर नेहमी आरक्षण दिलं पाहिजे, असं कंगनानं ट्विट केलं आहे. गरिबीच्या आधारावर नेहमीच आरक्षण दिले जावं. जातीच्या नावावर आरक्षण असू नये. मला माहिती आहे की, राजपूत समाज खूप संकटात सापडला आहे, परंतु ब्राह्मणांची स्थिती पाहून तर खूप वाईट वाटत असल्याचं, तिनं म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here