मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कल्याणजवळील आंबिवली येथील रहिवासी आहे. प्रिया (वय ५०) असे तिचे नाव आहे. पती शिवदास यांचे अन्य एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय प्रिया यांना होता. गुरुवारी प्रिया यांनी पती शिवदास यांचा कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत पाठलाग केला. त्यानंतर तिथे संबंधित महिला होती. तिने महिलेशी वाद घातला. दोघींमध्ये बाचाबाची झाली. प्रिया हिने तिच्याजवळील चाकू बाहेर काढला आणि महिलेवर सपासप वार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर तेथील नागरिकांनी जखमी महिलेला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले. कल्याण पोलिसांनी प्रिया हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून हल्ला करण्यासाठी आणलेला चाकू हस्तगत केला आहे. महिलेला न्यायालयात हजर केले असता, तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पतीचे महिलेसोबत अफेअर होते. तिचा पती कंत्राटदार आहे. महिलेसोबत त्याचे अफेअर होते. या महिलेवर तो सर्व पैसे खर्च करायचा, असे आरोपी महिलेचे म्हणणे आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times