चिराग पासवान यांनी यांच्याविरुद्ध जोरदार हल्लाबोल केलाय. सोशल मीडियावर आणि मोहीम लोजपकडून सुरू करण्यात आलीय. सोबतच आज चिराग पास यांनी केलेल्या एका ट्विटनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. ‘तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे की ज्या मतदारसंघांत लोक जनशक्ती पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहे त्या सर्व ठिकाणी लागू करण्यासाठी लोजपाच्याच उमेदवारांना मतं द्या. तर इतर ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांना मतं द्या. येणारं सरकार हे नितीशमुक्त सरकार बनणार’ असं ट्विट करताना #नीतीशमुक्तसरकार आणि #असम्भवनीतीश हे हॅशटॅगही त्यांनी वापरले आहेत.
वाचा : वाचा :
चिराग पासवान एकप्रकारे आपल्या सर्वच सभांमध्ये नितीश सरकारला पाडण्याची आणि भाजप – लोजपचं एनडीए सरकार बनवण्याचंच चित्रं लोकांसमोर मांडत आहेत. त्यांनी जेडीयूविरुद्ध सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आहेत. अनेक जागांवर भाजपच्याच बंडखोरांना लोजपचं तिकीट देऊन जेडीयूविरुद्ध मैदानात उतरवलंय. उल्लेखनीय म्हणजे, एकट्याच्या दमावर लढवत असलेली ही चिराग पासवान यांची पहिलीच निवडणूक आहे. एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर जेडीयूचा विरोध करणारे चिराग पासवान भाजपचं मात्र समर्थन करत आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, ‘मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात भाजप कट रचत आहे. त्यांना निवृत्त करून भाजप आमदाराला बिहारचा मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू आहे’, असा आरोप नुकताच एआयएमआयएम अध्यक्ष यांनी केला होता.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times