न्यूयॉर्क: अमेरिकेतील शहरात राहणाऱ्या एका कर्णबधिर व्यक्तीने तीन पॉर्न वेबसाइट्सविरुद्ध भेदभाव केल्याचा आरोप करत खटलाच दाखल केला आहे. पॉर्न पाहताना देण्यात न आल्याने वेबसाइटवरील व्हिडिओंची पूर्णपणे मजा घेता आली नाही, अशी तक्रार या व्यक्तीने आपल्या अर्जात केली आहे.

यारोस्लाव सुरीज असे पॉर्न वेबसाइटविरुद्ध तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने ब्रुकलीन फेडरल कोर्टात हा खटला दाखल केला आहे. सुरीजने पॉर्नहब, रेडट्यूब आणि यूपॉर्न आणि या बेवसाइटची कॅनडातील मुख्य कंपनी माइंडगीकविरुद्ध हा खटला दाखल केला आहे. या वेबसाइट ‘अमेरिकंस विद डिसेबॅलिटी अॅक्ट’ (दिव्यांगांसदर्भातील कायदा) या कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे सुरीजने म्हटले आहे. यापूर्वीही सुरीजने फॉक् न्यूजविरोधात खटला दाखल केलेला आहे.

आपण ऑक्टोबरआणि या महिन्यात काही व्हिडिओ पाहण्याचे ठरवले होते, मात्र ते पाहू शकलेलो नाही, असे सुरीज यांनी म्हटले आहे. या वेबसाइट्सविरुद्ध तक्रार करताना सुरीज यांनी २३ पानांचा अर्ज लिहिला आहे. सबटायटलशिवाय जे कर्णबधिर आहेत, तसेच ज्यांना कमी ऐकायला येते अशा लोकांना व्हिडिओचा पूर्ण आनंद मिळत नाही, असे सुरीज यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. सर्वसामान्य लोकांना मात्र सबटायटल्स नसतील तर विशेष फरक पडत नाही, असेही सुरीज यांनी म्हटले आहे. सुरीज यांनी अर्जात नुकसानभरपाई देण्याचीही मागणी केली आहे. सर्व वेबसाइट्सनी सबटाटल देत जावे असे आपल्याला वाटत असल्याचे सुरीज यांनी म्हटले आहे. मात्र, आपल्या वेबसाइटवर सबटायटल असलेले एक सेक्शन असून त्या सेक्शनची लिंकही वेबसाइटवर देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण पॉर्नहब या वेबसाइटचे उपाध्यक्ष कोरी प्राइस यांनी दिले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here