पालघर: गुरे चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षांच्या आदिवासी मुलीवर झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनोरमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर पीडित मुलीसह कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मनोरमध्ये २१ ऑक्टोबरला ही घटना घडली. पीडित मुलगी गुरे चारायला शेतावर गेली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला फरफटत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अनोळखी व्यक्तीविरोधात कलम ३७६ आणि पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times