मुंबई: करोनाचं संकट असल्याने यंदाचा बंदिस्त सभागृहात घेत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख अशा दुहेरी भूमिकेतून या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान करण्याचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाल्याने ती किनार उद्धव यांच्या भाषणात असणार आहे. गेल्यावर्षीचा दसरा मेळावा आणि यंदाचा दसरा मेळावा यात बराच फरक आहे. शिवसेनेचा तेव्हाचा मित्रपक्ष राज्यामध्ये विरोधी पक्षात आहे तर जे विरोधक होते ते काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष सध्या शिवसेनेचे मित्र झाले आहेत. त्यात एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला मोठा धक्का दिला आहे. ते राष्ट्रवादीत गेले आहेत. दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळ, करोना, परतीच्या पावसाचा तडाखा अशी अनेक संकटे पहिल्याच वर्षात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वाट्याला आली आहेत. या सर्वावरच उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शिवाजी पार्कजवळच असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात निमंत्रितांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याचे क्षणोक्षणीचे अपडेट्स घ्या जाणून…
Live Updates…
– बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी शिवसैनिकांच्या रांगा.
– करोनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्याला फक्त निमंत्रितांनाच प्रवेश.
– उद्धव ठाकरे यांचे भाषण शिवसैनिकांना पाहता यावे म्हणून मेळाव्याचे होणार लाइव्ह प्रक्षेपण.
– उद्धव ठाकरे यांच्या भाषणात यंदा भाजपचे नेते असू शकतात निशाण्यावर.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times