या घटनेनंतर सेंट्रल जेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आग्रा येथील सेंट्रल जेल नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. परिसरात कडेकोट सुरक्षेचा दावा करण्यात येत असतानाच, जेलच्या पाठिमागील टॉवर क्रमांक दोनजवळ झुडपात एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी फेकल्याची घटना घडली आहे. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित मुलीला गुंगीचे औषध दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
लोहामंडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती शुद्धीवर आल्यानंतर नेमके काय घडले याची माहिती मिळू शकेल. दरम्यान, घटनेची माहिती दिल्यानंतरही तात्काळ कारवाई न करणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times