बलिया, उत्तर प्रदेशः चीन, पाकिस्तानशी युद्ध कधी करायचं? याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी केला आहे, असं उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं. पूर्व लडाखमध्ये सीमेवर भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असताना स्वतंत्र देव सिंह यांचं हे वक्तव्य आलं आहे.

राम मंदिरावरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावर स्वतंत्र देव सिंह यांनी आपलं मत मांडलं. राम मंदिर आणि कलम ३७० प्रमाणे पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान आणि चीनशी युद्ध कधी करायचं याचा निर्णय घेतला आहे, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. स्वतंत्र देव यांचा यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित (युद्धाची) तारीख निश्चित आहे झाली’, असं स्वतंत्र देव हे व्हिडिओत बोलताना दिसून येत आहेत.

बलियामध्ये भाजपचे आमदार संजय यादव यांच्या घरी आयोजित एका कार्यक्रमात स्वतंत्र देव सिंह बोलत होते. हा व्हिडिओ संजय यादव यांनी जाहीर केला आहे. यात स्वतंत्र देव सिंह यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली.

मात्र, प्रदेशाध्यक्षांच्या विधानाबाबत स्थानिक खासदार रवींद्र कुशवाह यांना प्रश्न विचारला गेला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ते असं बोलल्याचं कुशवाह म्हणाले. स्वतंत्र देव यांचं वक्तव्य हे भारताच्या भूमिकेला पेक्षा वेगळी आहे.

दरम्यान, चीनशी सुरू असलेला सीमेवरील तणाव भारताला संपवायचा आहे, असा पुनरुच्चार रविवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. भारताच्या सीमेवर एक इंच जमीनही कुणाला बळकाऊ देणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here