वाचा:
क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही, असे नमूद करताना ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. भाजपला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देश काबीज करायचा आहे. तसे वर्चस्व त्यांना मिळवताही आले असते पण त्यांची मस्ती, त्यांची वृत्ती यामुळे ते होणार नाही. त्यामुळेच त्यांच्यापासून सगळे मित्र दुरावत चालले आहेत. दहिहंडी फोडण्यासाठी थरावर थर लावून वर गेलेत खरे पण वरती ते आता एकटेच आहेत. खाली कोणच राहिलेलं नाही. असं लटकल्यावर काय अवस्था होते तुम्हाला माहितच आहे, असे नमूद करत येत्या काळात भाजपला उतरती कळा लागल्याशिवाय राहणार नाही, असे संकेतच उद्धव यांनी दिले.
वाचा:
आमच्या सरकारचा विचार करू नका, आधी तुमचं सरकार सांभाळा असा सल्ला देत उद्धव यांनी भविष्यातील आडाखे बांधले. आपल्याशिवाय कुणीही नाही या भ्रमातून आता बाहेर या. हे तुमचे असेच सुरू राहिले तर एक दिवस कुणीही चालेल पण हे नको, असे जनता म्हणेल. जनताच तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल, असा इशारा उद्धव यांनी दिला. बिहारमध्ये नितीशकुमारच मुख्यमंत्री असतील असे भाजपने म्हटले आहे. त्यावरून उद्धव यांनी नितीश यांना सावध केले. भाजपने हरयाणातही कुलदीप बिष्णोई यांना असे वचन दिले होते. मात्र निवडणुका झाल्यानंतर त्यांचा पत्ता कट करून स्वत:चे राज्य आणले. नितीश यांनी यातून बोध घ्यावा, असा सल्ला उद्धव यांनी दिला. बिहारच्या जनतेने कोणत्याही दबावाखाली न येता डोळे उघडे ठेवून यावेळी मतदान करावे, असे आवाहनही उद्धव यांनी केले.
बेडूक आणि त्याची दोन पोरं!
बिहारमध्ये करोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन भाजपने निवडणूक जाहिरनाम्यात दिले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेलक्या शब्दांत त्याचा समाचार घेतला. ‘सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. पण आपल्याकडे काही जणांना लस, इंजेक्शन देण्याची गरज असते. काही जणांना माणसांची इंजेक्शन चालत नाही, गुराढोरांची द्यावी लागतात आणि काही जणं तर अशी बेडकं असतात…सध्या एक बेडूक आणि त्याची दोन पोरं, या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. मी लहान असताना एक गोष्ट, कविता की गाणं काहीतरी होतं, बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला तसं या बेडकाच्या पिल्लाने वाघ पहिला आणि वाघाची डरकाळी ऐकली…मग जाऊन बाबाला सांगितलं आणि बाप आवाज काढतोय. पण चिरका, किरका आवाज येतोय तर बेडूक कसा काय वाघ होऊ शकेल, होऊच शकत नाही’, असा मोघम टोला उद्धव यांनी लगावला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times