वाचा:
महाराष्ट्रात जसं काही फक्त गांजा आणि चरसची शेतीच पिकते आणि इकडे सगळेच नशिले आहेत, अशाच पद्धतीने चिखलफेक केली जात आहे. आमच्या राज्यात प्रत्येक घरासमोर तुळशी वृदांवन डौलते आहे. ‘मै तुलसी तेरे आंगन की’, असे हे चित्र आहे इथे ‘मै गांजा तेरे घर का’, असले पिक्चर कधी निघाले नाहीत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
अभिनेता याच्या आत्महत्येनंतर राजकारण तापल असताना कंगना राणावतने मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केला होता तसेच मुंबई पोलिसांनाही तिने लक्ष्य केले होते. या प्रकरणात काही भाजप नेत्यांनी यांनाही ओढण्याचा प्रयत्न केला. त्याचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. पाकव्याप्त काश्मीर भारतात घेऊ असे पंतप्रधान नरेंद्र मोदीच म्हणतात. पण प्रत्यक्षात आपल्या ताब्यात जे काश्मीर आहे तेथील जमिनीचा साधा तुकडाही आपण घेऊ शकत नाही, अशी आजची स्थिती आहे. हे सगळे असताना आपल्याच देशातील एखाद्या भागाला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा एकप्रकारे पंतप्रधान मोदींचाच अपमान आहे, असे उद्धव म्हणाले.
वाचा:
‘रावणी औलाद’, ‘नमकहरामी’ असे जहाल शब्द वापरत मुंबईबद्दल अनुद्गार काढणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले. मुंबई आणि महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करायची, असा हा सगळा प्रकार आहे. एकाने आत्महत्या केली, लगेच तो बिहारचा पुत्र झाला! त्याने आत्महत्या केली, त्यात काही काळंबेरं असेल तर माझ्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या पोलिसांनी ते ही शोधूनही काढलं असतं. पण लगेच बिहारचा पुत्र म्हणून गळे काढले गेले आणि महाराष्ट्राच्या पुत्रावर चिखलफेक करायला लागले? महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र प्रदेश, ठाकरे कुटुंबीय, आदित्यवर चिखलफेक केली गेली. तोंडात शेण भरून भरून, होय मी जाणीवपूर्वक बोलतोय, तोंडात शेण भरून गोमुत्राच्या गुळण्या तुम्ही आमच्यावर टाकल्या. पण काय झालं? आता तेच शेण आणि गोमुत्राने भरलेलं तोंड, याचा आवंडा गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा, अशा शब्दांत उद्धव यांनी प्रतिहल्ला केला. तुम्ही आमचे काही वाकडे करू शकत नाही, कारण आम्ही हाताने स्वच्छ आहोत, पापी वृत्तीची माणसं आम्ही नाही, असेही ते म्हणाले.
वाचा:
‘देशाचे तुकडे आपण होऊ देणार नाही. मुंबई तर तुम्ही महाराष्ट्रापासून तोडूच शकत नाहीत. कारण शिवसेनाप्रमुखांनी शिवतीर्थावरून इशारा दिला आहे, जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या देहाचे आम्ही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेना जिवंत आहे आणि शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही. जो काही कारभार आम्ही करत आहोत, तो महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने करत आहोत. पण भारतीय जनता पक्षाचे काय? भाजप जे काही करत आहे, भाजप नेते ज्या पद्धतीने वागत आहेत त्यांनी निदान ज्या मातीत जन्मले तिच्याशी तरी इमान ठेवावे. आम्ही जर महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला असेल तर फटाके नका वाजवू पण निदान खोटं तरी बोलू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times