वाचा:
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री व भाजप नेते यांनी टीका केली होती. ‘चोरून लग्न तुम्ही करता आणि संसार बापाला चालवायला सांगता?’, असे दानवे म्हणाले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. ‘दानवे, तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय तो तुमचा बाप असेल, माझा बाप इकडे आहे. माझा बाप माझ्या विचारांमध्ये आहे. मला भाडोत्री बापाची गरज नाही. तो तुमच्याकडेच ठेवा, असे सुनावताना आहेराची पाकिटं पळवणारा तुमचा बाप तुम्हालाच लखलाभ असो, असा हल्ला ठाकरेंनी चढवला.
वाचा:
मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ‘ते काय म्हणाले? विलासी राजा आणि त्याची अहंकारी मुलं? मग मी असं म्हटलं तर, अहंकारी राजा आणि त्याच्या कळसूत्री बाहुल्या! या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आता महाराष्ट्राने संपवला आहे आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही. इकडे मर्द मावळ्यांचेच सरकार येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. मी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण हे सरकार पाडण्याच्या मागे आहेत. मी इथून पुन्हा आव्हान देतो की, हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा. आम्ही गुळाला चिकटणारे मुंगळे नाही पण मुंगळा कसा डसतो ते आम्ही दाखवू, असे मुख्यमंत्री म्हणाले. सध्या जे काही देशात चालले आहे, ते फार विचित्र आहे. करोनाचे संकट आहेच, जगभरात अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. अशा परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष न देता केवळ सरकार पाडापाडी करण्यामध्ये भाजपला रस असेल तर मला असं वाटतं की, आपण अराजकाला आमंत्रण देत आहोत, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला.
वाचा:
मी मुख्यमंत्री आहे म्हटल्यावर मी महाराष्ट्र राज्याचा कुटुंबप्रमुख आहे. मला माझ्या जनतेची काळजी आहे. तुम्हाला नसेल, तुमच्यासाठी महाराष्ट्रातील जनता फक्त मतं असतील, असे नमूद करत संयमाने वागण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times