नवी दिल्लीः करोना व्हायरसविरोधातील ( ) लढाईत भारताने मोठी कामगिरी केली आहे. देशातील रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्याचवेळी नवीन रुग्णांपेक्षा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. देशातील करोनातून मुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ही ७०,७८, १२३ इतकी झाली आहे. यानुसार करोनातून बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. गेल्या २४ तासांत आणखी ६२,०७७ जण करोनातून बरे झाले. तर या काळात ५०, १२९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येच्या तुलनेत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही ६४,०९,९६९ जास्त आहे.

गेल्या एका आठवड्यापासून सातत्याने एक हजाराहून कमी रुग्णांचा मृत्यू होत आहे. २ ऑक्टोबरपासून हा आकडा १,१०० पेक्षा कमी असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात सध्या ६,६८,१५४ जणांवर उपचार सुरू आहे. जे एकूण रुग्णांपैकी ८.५० टक्के आहेत. १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये- महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७५ टक्के आहे.

महाराष्ट्रात दिवसाला १० हजाराहून अधिक रुग्ण होताहेत बरे

महाराष्ट्रात दिवसाला १० हजाराहून अधिक नागरिक करोनातून बरे होत आहेत. तर करोनाचे नवीन ५०,१२९ रुग्णापैकी ७९ टक्के या १० राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशातील आहेत. केरळमध्ये सर्वाधिक ८ हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात ६ हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत करोनामुळे ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सुमारे ८० टक्के ही १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

महाराष्ट्रात मृत्यूची संख्या सर्वाधिक १३७ आहे. मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार सकाळी ८ वाजता भारतात ५०,१२९ नवीन रूग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या ७८,६४,८११ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १,१८,५३४ वर पोहोचला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here