मुंबई: ‘महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल असे मी काही करणार नाही’ अशी शपथच मुख्यमंत्री यांनी दसरा मेळाव्यात घेतली. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच समाजांना आश्वस्त करताना कुणाच्याही कारस्थानांना बळी पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. जीएसटीवरून यावेळी केंद्रावर जोरदार निशाणा मुख्यमंत्र्यांनी साधला. ( address to )

वाचा:

‘मी हात जोडून एकच नम्र विनंती करतो की, जातीपाती आणि समाजामध्ये जे कोणी महाराष्ट्रद्वेष्टे भिंती उभ्या करू इच्छित असतील, त्यांच्या कारस्थानांना बळी पडू नका. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात, तुम्ही म्हणजे शिवरायांचे मर्द मावळे आहात. तुमच्यामध्ये जर तुटफुट झाली, तर महाराष्ट्राचे तुकडे करायला ते मागेपुढे बघणार नाहीत. म्हणूनच मराठा, ओबीसी, धनगर समाज व सर्वांनाच सांगणे आहे की, आम्ही तुमचे आहोत, हे सरकार तुमचे आहे. कोणत्याही समाजाला न्याय दिल्याशिवाय मी शांत राहणार नाही, हे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझे वचन आहे आणि हा न्याय देताना कोणाचही काही काढून देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.

वाचा:

आरेचं जंगल हे राखीव वन म्हणून जाहीर करताना तेथील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यावर उद्धव यांनी भाष्य केले. आरेचं जंगल वाचवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबईसारख्या शहरात जवळपास ८०० एकरावर वनाचे संवर्धन होणार आहे. जगात दुसरीकडे कुठेही असे उदाहरण नसेल. जंगलं उजाड करून शहरं वसवली गेलेली आहेत पण शहरामध्ये जंगल राखणे हे तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने करून दाखवले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मेट्रोच्या कारशेडसाठी रातोरात झाडांची कत्तल करण्यात आली होती. मी मुख्यमंत्री होताच सर्वप्रथम त्या कारशेडला स्थगिती दिली, त्यानंतर अभ्यास झाला. आता अभ्यास किती काळ करायचा? म्हणून आम्ही निर्णयही घेतला, असे नमूद करत आता तुमचं सरकार गेलं तरी तुमचा अभ्यास होत नाही त्याला मी काय करू, असा टोलाच मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना लगावला.

…तर पंतप्रधानांनी चूक मान्य करावी!

देशावर महामारीचं संकट असताना जीएसटीचे आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळत नाहीत. प्रत्येक जण बोंब मारतोय, पत्रावर पत्र लिहिली जाताहेत, त्या पत्रांना केराची टोपली दाखवली जात आहे. म्हणजे प्रणाली फसली आहे का? आणि हे खरे असेल तर त्यासाठी पंतप्रधानांनी आपली चूक मान्य करून देशाची माफी मागायला हवी, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जीएसटीवरून निशाणा साधला. ‘का म्हणून तुम्ही कर्ज उचलताय व आम्हाला उचलायला लावताय? हे कर्ज फेडणार कोण? कर गोळा करण्याचा जो आमच्याकडे अधिकार होता तो तुम्ही काढून घेतला. आता सरळ द्यायचं ते फिरवून का देताय तुम्ही? म्हणजे इथला पैसा दिल्लीत जाणार आणि दिल्ली मग सगळीकडे वाटणार. हा काय प्रकार आहे, असा जाबच मुख्यमंत्र्यांनी विचारला. आता सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन जीएसटी रद्द करण्याची मागणी करण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here