पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते ( ) तुरूंगात असले तरी सातत्याने ट्विट करून ते बिहार विधानसभा निवडणुकीत ( ) सक्रिय आहेत. लालू प्रसाद यादव यांनी रविवारी मुख्यमंत्री नितीशकुमारांना ( ) मिश्किल शब्दांत चिमटा काढला. यांनी त्यांच्या शर्ट कॉलरमध्ये मानेवर चष्मा लावला आहे. लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमारांवर अशी टीका का केली? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

शिवहर जिल्ह्यात शनिवारी जनता दल राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार श्रीनारायण सिंह यांची गुन्हेगारांनी गोळ्या घालून हत्या केली. या हत्याकांडानंतर संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते अजय आलोक यांनी ट्वीट केलं. या घटनेचा संदर्भ देत प्रश्न केला, काही आठवतंय का तुम्हाला?. आलोक यांनी इशाऱ्यांमधून आरजेडीवर हल्ला चढवला. ‘निवडणुका येताच बिहारमध्ये जंगलराजमधील कटू घटनांची आठवण येते’, असं ते म्हणाले.

लालू प्रसाद यादव यांनी ट्विटमधून नितीश कुमारांना लक्ष्य केलं. नितीशकुमारांच्या राज्यात एका उमेदवाराची गोळ्या घालून हत्या केली गेली. यामुळे राज्यात कथित सुशासन आहे, अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमारांवर केली. यासोबतच लालू प्रसाद यादव यांनी ट्विटमधून नितीशकुमारांना मिश्किल शब्दांत चिमटाही काढला. ‘नितीशकुमारांच्या मानेवर शर्टच्या कॉलरमध्ये चश्मा आहे. यामुळे त्यांना फक्त मागंचं दिसतं. बिहारचं वर्तमान आणि भविष्य अंधारात ढकलून ते भूतकाळात जगत आहेत’, असं लालू प्रसाद यादव म्हणाले.

नितीशकुमार यांच्याकडे निवडणुकीत कुठलाही मुद्दा नाहीए. यामुळे ते फक्त १५ वर्षांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकाळाची जनतेला आठवण करून देत आहेत, असा टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here