मुंबई: महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी पाच हजार ६४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ६० हजार ७५५ करोना रुग्णांनी या आजाराला मात दिली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.८ टक्के झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री यांनी दिली आहे. रविवारी राज्यात सहा हजार ५९ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर क्षेत्रात एक हजार २२२ रुग्ण आढळले आहेत. ( Latest Updates )

वाचा:

राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ४५ हजार २० इतकी झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ११२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात करोनामुळे दगावलेल्यांची एकूण मृत्यूसंख्या ४३ हजार २६४ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के आहे, असे टोपे यांनी सांगितले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८६ लाख ०८ हजार ९२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ४५ हजार २० म्हणजेच १९.११ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख १८ हजार ०१६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १३ हजार ५७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, असे ते म्हणाले.

वाचा:

मुंबई महापालिका क्षेत्रात रविवारी एक हजार २२२ करोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या दोन लाख ५१ हजार २८१ झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ४६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईत दगावलेल्या करोना रुग्णांची एकूण संख्या १० हजार १०५ इतकी झाली आहे. मुंबईचा अपवाद वगळता राज्याच्या सर्व जिल्हा व महापालिका हद्दीत रविवारी एक अंकी करोना मृत्यू नोंदवले गेले.

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ९५ दिवसांवर

मुंबईत ऑगस्टअखेरीस एकाएकी वाढलेली करोनारुग्णांची वाढती संख्या हळूहळू आटोक्यात येत आहे. गेल्या १० दिवसांचा आढावा घेतल्यास रुग्णदुपटीचा कालावधी ६९ दिवसांवरुन थेट ९५ दिवसांवर पोहोचला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण कालावधीत रुग्णवाढीचा सरासरी दरही घटून ०.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी हा दर १.०१ टक्क्यांपर्यंत आला होता. मुंबईत रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक स्वरूपात जाणवत होती. या वाढीस हळूहळू उतार पडत आहे. यापूर्वी दिवसागणिक दोन हजारांहून अधिक असणारी रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. ही संख्या १२०० ते १५०० इतकी कमी झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून निष्पन्न झाले आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दरही ८७ टक्क्यांपर्यंत आला आहे. मधल्या कालावधीत करोनारुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने पालिकेसमोर पुन्हा आव्हान निर्माण झाले होते. सप्टेंबरचा विचार केल्यास १ सप्टेंबरला रुग्णदुपटीचा कालावधी ८० दिवसांवर आला होता. तो १० सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार घसरत ६३ दिवसांवर पोहोचला. तर दैनंदिन रुग्णसंख्येची आकडेवारीही दोन हजारांवर गेली होती. या परिस्थितीत पालिकेच्या आरोग्य विभागाने नव्याने बांधणी करून उपाय योजण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलेल्या योजनांमुळे १० ऑक्टोबरमध्ये ६९ दिवसांवर पोहोचलेला रुग्णदुपटीचा कालावधी १९ ऑक्टोबरला ९५ दिवसांवर आला आहे. १९ ऑक्टोबरपर्यंत एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ४३ हजार १७२ वर पोहचली असून आतापर्यंत दोन लाख १२ हजार ९०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ९,७७६ रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे. आताच्या घडीला उपचाराधीन रुग्णांची संख्या १८,६२४ असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here