पाटणाः करोना व्हायरस संकटाच्या काळात बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणुकीचा आज सोमवारी पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवसामुळे राज्यात आज बड्या नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री , राष्ट्रीय जनता दलाचे नेते यांच्यासह अनेक मोठे नेते आज प्रचारसभा घेणार आहेत.

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा सोमवारी दोन ठिकाणी निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत. दुपारी १२ वाजता नड्डा औरंगाबादमध्ये सभा घेतील आणि संध्याकाळी ३.५५ वाजता ते पूर्णियामध्ये सभा घेतील. नड्डा यांच्या व्यतिरिक्त भाजप नेते भूपेंद्र यादव आणि अभिनेता-खासदार रवी किशनही आज चार प्रचारसभा घेणार आहेत.

भाजप नेते भूपेंद्र यादव आणि अभिनेते-खासदार रवी किशन आज राजौली, नवीननगर, दिनारा आणि बक्सरमध्ये सभा घेतली. याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि संजय जयस्वाल यांच्या तीन सभा होणार आहेत. भाजपचे हे दोन्ही नेते वरसालीगंज, बोधगया आणि शाहपूर येथे प्रचारसभा करतील.

नितीशकुमार यांच्या आज तीन प्रचारसभा

बिहारमध्ये यावेळी ३ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला होणार आहे आणि म्हणूनच आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सर्व पक्ष मतदारांना आपल्याला मत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या व्यतिरिक्त संयुक्त जनता दलाचे नेते आणि मुख्यमंत्री नितीशकुमार हे तीन प्रचारसभा घेतील. आज ते मुझफ्फरपूर, महुआ आणि मनहर (वैशाली) येथे जाहीर सभा करतील. पण नितीशकुमार ज्या ३ ठिकाणी सभा घेणार आहेत, तिथे दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे.

तेजस्वी यादव यांच्या १० हून अधिक सभा

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आज सकाळी १० वाजता भागलपूरमध्ये प्रचारसभा घेतील. तेजस्वी यादव हे भागलपूर, खगेडिया, वैशाली, बेगूसराय येथे जाहीर सभा घेतील. एकट्या भागलपूरमध्ये तेजस्वी यांच्या ५ सभा आहेत. खगडियामधील ४ सभांशिवाय इतर ४ ठिकाणी सभा घेणार आहेत.

एवढेच नाही तर कॉंग्रेस नेते राजीव शुक्ला आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here