देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वच नेत्यांनी योगदान दिले असून सर्वच रत्ने महान आहेत, असे सूचक वक्तव्यही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचं बरं चाललेलं आहे पाहून काहींच्या पोटात दुखत आहे. मात्र, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची युती कायम आहे, असे आदित्य म्हणाले. प्रत्येकाची वेगळी मतं असतात, त्यालाच लोकशाही म्हणतात, असे म्हणत त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. मात्र असे म्हणत या विषयावर वाद कशाला, इतिहासावर चर्चा व्हायला नको, सर्व नेते महान होते. सगळीच आपली दैवतं आहेत, रत्न आहेत. वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश विकास करतोय का याकडे लक्ष देण्याचा आवश्यकता आहे, असे सांगत या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी दिले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणाऱ्यांना ज्या तुरुंगात इंग्रजांनी सावरकरांना ठेवले होते, त्याच तुरुंगात पाठवायला हवे, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. असे केल्याने विरोधकांना सावरकरांनी भोगलेल्या हालअपेष्टांची अनुभूती होईल, असेही ते पुढे म्हणाले. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसदरम्यानचे संबंध बिघडण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला तर या निर्णयाचा विरोध करायला हवा असे वक्तव्य काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यानी नुकतेच केले आहे. या पूर्वीच काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर यांचा माफीवीर असा उल्लेख करत त्यांना भारतरत्न देण्याला विरोध दर्शवला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times