चिराग यांनी मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. लोकजशक्ती पार्टीची सत्ता आल्यास सीतामढीमध्ये सीता मंदिर ( sita temple ) बांधले जाईल. आपण मोदींचे हनुमान आहोत असं म्हणत चिराग पासवान यांनी राम मंदिरापेक्षाही मोठं सीता मंदिर बांधणार असल्याचं सांगतिलं. एएनआयने हे वृत्त दिलंय.
राम सीतेशिवाय अपूर्ण आहे आणि त्याचप्रमाणे सीता रामाशिवाय अपूर्ण आहे. अयोध्येतील राम मंदिर सीतामढीच्या सीता मंदिराशी जोडण्यासाठी एक कॉरीडोरही बांधला जाईल, असं चिराग पासवान म्हणाले. सीतामढीतील पुनौरा धाम इथं पूजा करण्यासाठी चिराग पासवान आले होते.
व्हिजन डॉक्युमेंटमध्ये राम-सीता कॉरिडॉरचा उल्लेख आहे
‘बिहार फर्स्ट-बिहारी फर्स्ट’च्या व्हिज्युअल डॉक्युमेंटमध्ये सीता मंदिर बांधण्याचं आश्वासन दिलं आहे. यासह मंदिराच्या सभोवतालच्या क्षेत्राचा विकासही करण्यात येईल. अयोध्या सीतामढीला जोडणारा सहा पदरी कॉरिडॉरही बांधण्यात येईल. हा रस्ता बिहार-उत्तर प्रदेश सीमेपर्यंत बांधला जाईल आणि त्याचं नाव सीता-राम कॉरिडोर असे असेल, असं चिराग पासवान म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीत लोकजशक्ती पार्टीने जेडीयू विरोधात उमेदवार उभे केलेत आहेत. पण भाजपविरोधात नाही. बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times