महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्यानंतर अॅमेझॉनपाठोपाठ आता फ्लिपकार्टनेही अॅपमध्ये भाषेचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. मनसेला पत्र पाठवून मराठी भाषा लवकरच समाविष्ट केली जाईल, अशी फ्लिपकार्टनं शाश्वती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंगसाठी महत्त्वाची असलेल्या अॅमेझॉनने अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला होता. मनसेने अॅमेझॉनला मनसेने इशारा दिल्यानंतर इंडियाने नमते घेतले होते. कंपनीचे प्रतिनिधी आणि चिटणीस यांच्यात बीकेसी कार्यालयात एक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर अॅमेझॉन मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी तयार झाली. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करू, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times