राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा काल पार पडला. भाजपला धक्का देत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपनं शिवसेनेशी उभा दावा मांडला आहे. मुख्यमंत्री ठाकरे व शिवसेनेला सातत्यानं घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपवासी झालेले नारायण राणे व त्यांचे दोन्ही सुपुत्र देखील शिवसेनेवर व ठाकरे कुटुंबीयांवर टीका करत होते. उद्धव ठाकरे या साऱ्यांचा समाचार कसा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी शिवसेनेच्या सर्व विरोधकांवर जोरदार हल्ले चढवले. नारायण राणे व त्यांच्या दोन सुपुत्रांवर शेलक्या शब्दांत टीका केली.
वाचा:
नारायण राणेंना उद्धव ठाकरे यांनी बेडकाची उपमा दिली. ‘गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करताहेत, असं म्हणत त्यांनी एक कथाच ऐकवली. ‘बेडकीने बैल पाहिला ही गोष्ट आपण ऐकली असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाजच येईना. तो आता चिरका झालाय,’ असा चिमटा ठाकरे यांनी काढला होता.
वाचा:
उद्धव ठाकरे यांच्या टीकेमुळं नीतेश राणे चांगलेच संतापले आहेत. ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. ‘दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट… मग तुम्ही काय दिनोच्या कुशीत नशा करून मुलींवर अत्याचार करणारा ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का?
इतकी खुमखुमी आहे तर मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता दिशा सालियनच्या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होऊ द्या. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते,’ असं नीतेश राणे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरही त्यांनी टीका केली आहे. ‘बिहारी जनतेच्या आधीच पक्षप्रमुखानी लस घेतलेली दिसते. किती आव आणत होते. जास्तच हवा भरलेली होती, पण ‘टाचणी’ तयार आहे. फक्त योग्य वेळ येऊन दया,’ असा इशाराही त्यांनी दिला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times