मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री यांनी केलेल्या टीकेवर भारतीय जनता पक्षाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्वांवर टीका करणारी शिवसेना काँग्रेसचे नेते सावरकरांच्या संदर्भात अपमानकारक बोलत असताना गप्प का होती?,’ असा सवाल भाजपचे प्रवक्ते यांनी ट्विटरद्वारे केला आहे. (BJP questions CM Uddhav Thackeray)

वाचा:

मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करून मुख्यमंत्रीपद पटकावले. भाजपसाठी हा मोठा धक्का होता. त्यामुळं भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा पुढं करून शिवसेनेला पुन्हा पुन्हा कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले. दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सर्व आरोपांना सडेतोड उत्तरं दिली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचे दाखले देत त्यांनी भाजपला सुनावले. ‘घंटा वाजवा, थाळ्या बडवा हेच तुमचे आहे का?,’ असा सवाल उद्धव यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

वाचा:

भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी सावरकरांचा मुद्दा काढून शिवसेनेच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानाऐवजी सभागृहात झाला होता. तोच धागा पकडून कदम यांनी शिवसेनेला सवाल केला. ‘माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहातून देशाला हिंदुत्वाचे धडे दिले. मात्र, काँग्रेसचे नेते सावरकरांच्या संदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते, त्या वेळी शिवसेना गप्प का होती हा आमचा प्रश्न आहे,’ असं कदम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘सर्वांवर टीका करत असताना सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी शिवसेना नेत्यांना का आठवले नाहीत? सत्ता आणि सिंहासनासाठी सावरकरांचा अपमान शिवसेनेला चालतो का,’ असा प्रश्नही त्यांनी केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here