करोनाच्या काळातही अजित पवार यांचा कामाचा धडाका सुरू होता. लॉकडाऊनच्या काळात मंत्रालयात त्यांची नियमित उपस्थिती असायची. ते बैठका घेत होते. मात्र, करोनाच्या अनुषंगाने ते सर्व प्रकारची काळजी घेत होते. अलीकडेच त्यांनी अतिवृष्टग्रस्त भागांचा दौरा केला होता. तो दौरा करून परतल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांनी घरीच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळ्यालाही त्यांना उपस्थित राहता आलं नव्हतं. ‘देवगिरी’ निवासस्थानातूनच ते दैनंदिन शासकीय कामकाज करत होते.
वाचा:
दरम्यानच्या काळात त्यांनी करोनाची चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. ‘माझी प्रकृती उत्तम आहे. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,’ असं त्यांनी राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उद्देशून म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times