पॅरिस: इम्यॅनुअल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. मॅक्रॉन यांच्या वक्तव्यामुळे अनेक इस्लामिक देशांमध्ये फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात येत असून सोशल मीडियावर #BoycottFrenchProducts अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता इस्लामिक देश आणि फ्रान्स यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच पॅरिसमध्ये एका शिक्षकाची हत्या करण्यात आली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धडा शिकवताना या शिक्षकाने चार्ली हेब्दोमध्ये प्रकाशित झालेल्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवले होते. त्यानंतर एका कट्टरपंथीय मुस्लिम युवकाने त्या शिक्षकाची हत्या केली. या घटनेनंतर फ्रान्समध्ये जोरदार कारवाई सुरू करण्यात आली. कट्टरवादी संघटना, संस्था सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आल्या. या घटनेची दखल राष्ट्रपती मॅक्रॉन यांनीदेखील घेतली होती.

वाचा:

मॅक्रॉन यांच्या वक्तव्यावर वाद का?

मागील आठवड्या मॅक्रॉन यांनी म्हटले की, इस्लाम या एका धर्मामुळे फक्त फ्रान्सच नव्हे तर संपूर्ण जगात संकट निर्माण झाले आहे. त्यांचे हे वक्तव्य अनेकांना पटले नाही. त्यानंतर सोशल मीडियावर #BoycottFrenchProducts, #BoycottFrance Products, #boycottfrance #boycott_French_products असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले.

इस्लामिक देशांकडून होत असलेला विरोध आणि बहिष्काराच्या आवाहनावर मॅक्रॉन यांनी म्हटले की, आम्ही कधीही पराभव स्वीकारणार नाही. आम्ही शांततेसह सर्व मतभेदांचा सन्मान करतो. मानवी प्रतिष्ठा आमि सार्वभौमिक मूल्यांचा कायम पुरस्कार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा:
अरब देशांमध्ये नाराजी
दरम्यान, अरब देशांनी मॅक्रॉन यांच्या वक्तव्याचा औपचारिकपणे निषेध नोंदविला असून काही इस्लामिक राष्ट्रांनी औपचारिकपणे पत्र पाठवले आहे. येमेनमधील मानवाधिकार कार्यकर्ते आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते तवाक्कोल कामरान यांचाही समावेश आहे. मॅक्रॉन यांनी इस्लामबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यातील असहिष्णुता आणि द्वेष दिसून आला असून फ्रान्ससारख्या देशाच्या प्रमुखांसाठी लज्जास्पद आहे. काही अरब देशांमधील मोठ्या सुपरमार्केट्समधून फ्रेंच उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

वाचा:

तुर्कीची ही टीका

या वादामुळे फ्रान्स आणि तुर्कीचे संबंध आणखीच बिघडू लागले आहेत. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैय्यप एर्दोआन यांनी मॅक्रॉन यांच्यावर जोरदार टीका केली. ज्या देशाचा प्रमुख धार्मिक स्वातंत्र्य समजू शकत नाही आणि दुसऱ्या धर्माचे आचारण करणाऱ्या लाखो नागरिकांसोबत दुजाभाव करत असेल तर त्या राष्ट्रप्रमुखांचे मानसिक स्वास्थ तपासण्याची आवश्यकता आहे.

वाचा:

मॅक्रॉन यांच्यावर तुर्कीने केलेल्या टीकेनंतर फ्रान्सने तुर्कीमधून आपल्या राजदूताला माघारी बोलावणार असल्याचे म्हटले आहे. चर्चेनंतर तुर्कीसोबत राजकीय संबंध संपुष्टात आणायचे की फ्रान्सच्या राजदूतांना कायम स्वरुपी माघारी बोलवायचे यावर निर्णय होणार असल्याचे फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयाने म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here