मुंबईः शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील हिंदुत्व आणि सावरकरांच्या मुद्द्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या नेत्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सर्व आरोपांना सडेतोड उत्तर दिलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपनंही उत्तर दिलं होतं. सर्वांवर टीका करणारी शिवसेना काँग्रेसचे नेते सावरकरांच्या संदर्भात अपमानकारक बोलत असताना गप्प का होती? असा सवाल भाजपनं केला होता. त्यावर संजय राऊत यांनीही ‘भाजपनं अद्याप सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?’, असा सवाल करत पलटवार केला आहे.

भाजप नेते राम कदम यांनी सावरकरांचा मुद्दा काढून शिवसेनेवर टीका केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ नेहमीच शिवसेनेचे मार्गदर्शक म्हणून राहिलेले आहेत. जेव्हा सावरकारांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला त्या वेळेला आम्ही त्यांच्याबाजूनं भूमिका घेतली. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणीही आम्ही पहिल्यांदा केली होती. जे आता आम्हाला प्रश्न विचारत आहेत, त्यांनी सावरकरांना भारतरत्न का दिला नाही, याचे उत्तर द्यावं? असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते राम कदम?

माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहातून देशाला हिंदुत्वाचे धडे दिले. मात्र, काँग्रेसचे नेते सावरकरांच्या संदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते, त्या वेळी शिवसेना गप्प का होती हा आमचा प्रश्न आहे. ‘सर्वांवर टीका करत असताना सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी शिवसेना नेत्यांना का आठवले नाहीत? सत्ता आणि सिंहासनासाठी सावरकरांचा अपमान शिवसेनेला चालतो का? असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.

वाचा: वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here