मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि अॅंकर नेहमीच तिच्या फॅशनसाठी चर्चेत असते. पण सध्या ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलीए. चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मंदिरानं नुकतीच एक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली. तिच्या कुटुंबात आणखी एक सदस्याचं आगमन झालं आहे. मंदिरानं ४ वर्षाच्या एका मुलीला दत्तक घेतलं आहे.

दसऱ्याच्या दिववशी मंदिरानं ही खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली. फोटो शेअर करत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्यात. २८ जुलै २०२० रोजीच मंदिराच्या घरी तिच्या या लेकीचं आगमन झालं . ‘ देवाचा आशिर्वाद म्हणून ती आमच्या घरात आली. आमची छोटीशी मुलगी तारा. चार वर्षाहून थोडी मोठी. तिच्या डोळ्यात ताऱ्यासारखीच चमक आहे. आमच्या वीरची धाकटी बहिणी. तिचं नाव ‘, असं म्हणत मंदिरानं ताराचं खुल्या मनानं कुटुंबात स्वागत केलं आहे.

मंदिरानं ताराला दत्तक घेतल्याचा निर्णय तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून सोशल मीडिावर तिचं प्रचंड कौतुक होत आहे. मंदिराच्या या पोस्टवर चाहत्यांनी तसंच अनेक सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

जेव्हा डीडी नॅशनल हे चॅनल आवडीने पाहिलं जायचं तेव्हा ‘शांती’ या मालिकेनं सगळ्यांना पार वेडं केलं होतं. मंदिरा बेदी नावाची हॉट बेब याच मालिकेमुळं सगळ्यांच्या ओळखीची झाली. तिच्या कपाळावरची सापाची टिकली तमाम महिलावर्गात लोकप्रिय झाली होती. शांतीमधील तिच्या भूमिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं. पण, या मालिकेनंतर ती फार कुठं झळकली नाही. नाही म्हणायला तिच्या वाट्याला ‘औरत’, ‘क्योंकी सासभी कभी बहू थी’मधील भूमिका वाट्याला आल्या . मालिकांमध्ये तिची डाळ शिजली नाही, तरी एक्स्ट्रा इनिंगनं तिच्या करिअरला चांगलंच सावरलं. १९९९ मध्ये मंदिरानं चित्रपट दिग्दर्शक राज कौशल यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर १२ वर्षानं तिनं तिचा मुलगा वीर याला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत मंदिरानं मुलीला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here