वाचा:
प्रकरणात मुंबई, मुंबई पोलीस व यांच्यावर कंगना राणावत सातत्यानं आरोप करत होती. मुख्यमंत्री ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलण्यापर्यंत तिची मजल गेली होती. केंद्रातील भाजप सरकारनं तिला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागलं होतं. उद्धव ठाकरे यांनी या घडामोडींवर मौन बाळगलं होतं. मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून एक दिवस बोलेन, असं ते म्हणाले होते. कालच्या दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे त्यांनी शिवसेनेच्या टीकाकारांवर टीकेचे आसूड ओढले. कंगनाचं नाव न घेता त्यांनी त्याला ‘नमक हराम’ म्हणून हिणवले होते. स्वत:च्या राज्यात खायला मिळत नाही म्हणून हे मुंबईत येतात आणि इथे नमकहरामी करतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. या टीकेला कंगनानं आज ट्विटरवरून उत्तर दिलं.
वाचा:
‘उद्धव ठाकरे हे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याप्रमाणे हिमालयाचं सौंदर्य प्रत्येक भारतीयाचं आहे, त्याचप्रमाणे मुंबई सर्वांची आहे. ही दोन्ही माझी घरं आहेत. लोकशाहीने दिलेले हे अधिकार उद्धव ठाकरे माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाहीत. तुमची टुकार भाषणं तुमच्या अकार्यक्षमतेचा पुरावा आहेत,’ अशी टीकाही तिनं केली आहे.
वाचा:
‘तुमच्याप्रमाणे मी घराणेशाहीचं अपत्य नाही. मी माझ्या वडिलांच्या संपत्तीवर कधी नशा केली नाही. तसं असतं तर हिमाचलमध्येच राहिले असते. मी एका चांगल्या घरातून आलेय. पण मला त्यांच्या संपत्तीवर व नावावर जगायचं नव्हतं. कारण, काही लोकांना आत्मसन्मान असतो,’ असा टोला कंगनानं मुख्यमंत्र्यांना हाणला आहे.
‘संजय राऊत मला हरामखोर म्हणाले आणि उद्धव ठाकरे ‘नमक हराम’ म्हणत आहेत. मुंबईनं आश्रय दिला नसता तर मला खायला मिळालं नसतं असं ते म्हणतात. मी तुमच्या मुलाच्या वयाची आहे. स्वत:च्या हिंमतीवर मोठ्या झालेल्या महिलेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांना काहीतरी वाटलं पाहिजे,’ असंही तिनं म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times