वाचा-
दोन्ही संघातील आजवरच्या लढतीत कोलकाता १८ विरुद्ध ८ ने पुढे आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामात प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी कमालीची चुरस सुरू आहे. गुणतक्त्यात कोलकाता १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर पंजाबने ११ पैकी ५ विजय मिळून १० गुण मिळवले आहेत. आज कोलकाताने विजय मिळवल्यास त्यांचे १४ गुण होतील. तर पंजाबने विजय मिळवल्यास ते १२ गुणांसह अव्वल चार संघात पोहोचतील आणि त्यांची प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता देखील वाढेल.
वाचा-
पंजाबचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सलग पाच पराभवानंतर त्यांनी बेंगळुरूचा पराभव केला. त्यानंतर अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई आणि दिल्लीचा पराभव केला तर हैदराबादचा पराभव करून त्यांनी विजयाचा चौकार मारला. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना शिल्लक ३ सामन्यात विजय मिळवावा लागले.
वाचा-
गोलंदाजी ही पंजाबची डोकेदुखी ठरली आहे. मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोई वगळता अन्य कोणत्याही गोलंदाजाला प्रभाव पाडता आला नाही. शनिवारी हैदराबादविरुद्ध फलंदाज अपयशी ठरल्यावर गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. अखेरच्या दोन षटकात ५ विकेट घेत १२६ धावांचा बचाव केला. स्वत: कर्णधार केएल राहुल, मयांक अग्रवाल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. ख्रिस गेल संघासाठी लकी ठरला आहे. तो आल्यापासून पंजाबने एकाही सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. निकोलस पूरन देखील स्फोटक फलंदाजी करू शकतो हे दाखवून दिले आहे. ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म हाच काय तो पंजाबसाठी काळजीचा विषय आहे.
वाचा-
कोलकाताने गेल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. नितिश राणा आणि सुनिल नरेन यांनी ११५ धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने पाच विकेट घेत दिल्लीचा ५९ धावांनी पराभव केला होता. कोलकाताला जर विजय मिळवायचा असेल तर त्यांना फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times