लॉकडाऊनच्या नंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस राज्यभर दौरा करत होते. लॉकडाऊनच्या काळात ते कोव्हिड रुग्णालयांचीदेखील पाहणी केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांतही पाहणी दौरा केला होता. त्याच दरम्यान, त्यांना करोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यांनी स्वतःच ट्विट करत यांची माहिती दिली होती. एका युझरनं मात्र, फडणवीस हे करोना झाल्याचं नाटक करत आहेत, असं म्हटलं आहे. यावरून रोहित पवार यांनी त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कोणी खोटं बोलत नसतं. त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय बिहार निवडणुकीच्या मुद्द्यावरही त्यांनी लक्ष वेधलं आहे. दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
काय होतं ट्विट
‘करोना वगैरे काही नाही, बिहारमध्ये भाजप १०० टक्के हरणार आहे हे त्यांना स्पष्ट दिसतंय आणि त्याचं खापर आपल्यावर फोडू नये म्हणून हे करोनाचे नाटक, बाकी काही नाही दादा… असं ट्विट एका युझर्सनं केलं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times