मुंबईत भाजपच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात यांनी नारायण राणे व त्यांच्या पुत्रांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. राणे यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. आज मी स्पष्ट बोलतो. ते सत्तेचा दुरुपयोग करून मुलाला वाचवत आहे, असा गंभीर आरोप केला आहे.
‘सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल, त्याला कुणी मारलं आणि दिशाचा बलात्कार कोणी केली. तिच्या अंगावरील जखमा या वरुन खाली पडल्यामुळं झालेल्या नाहीत. तिला वरुन खाली कोणी टाकलं हे सर्व बाहेर येईल. या माणसानं त्याच्या आयुष्यात काहीही केलेलं नाही. इतरांच्या मदतीनं कामं केली. मुख्यमंत्री स्वतःच स्वतःच्या मुलाला क्लीन चीट देत आहेत. पण, सुशांतच्या खुनाच्या प्रयत्नात एक मंत्री आतमध्ये जाईल आणि तो ह्यांचा मुलगा असेल,’ असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर, ‘सीबीआयनं अद्याप ही केस बंद केलेली नाही त्यामुळं भ्रमात राहू नका. माझ्याकडेही पोस्टमार्टमचे अहवाल आहेत,’ असा ईशाराही त्यांनी दिला आहे.
किती पोलिसांचा वापर करणार, स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांचा वापर केला. लवकरच, सुशांतचे गुन्हेगार बाहेर येतील. त्याचबरोबर, दिशावर बलात्कार कोणी केला. या प्रकरणाचाही गुंता सुटेल, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times